Digvijay

  1. home
  2. Books
  3. Digvijay

Digvijay

4.34 49 2
Share:

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नेपोलियन नावाचं एक वादळ...

Also Available in:

  • Amazon
  • Audible
  • Barnes & Noble
  • AbeBooks
  • Kobo

More Details

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नेपोलियन नावाचं एक वादळ युरोपियन भूमीवर काही काळ घोंघावलं. संपूर्ण युरोपवर एकछत्री साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या नेपोलियननं त्याच्या पंचवीस वर्षांच्या राजकीय कालखंडात युरोपमधील एक सिंहासनं गदागदा हलवली. राजेशाहीविरुद्ध सर्वसामान्य जनतेच्या बाजूनं उभा ठाकलेला नेपोलियन स्वत:च फ्रान्सचा बादशहा बनला. लोकांनी त्याला मोठ्या प्रेमानं सिंहासनाधिति केलं. एक साधा कॉर्सिकन सैनिक बघता बघता फ्रान्सचा सर्वेसर्वा बनला आणि युरोपची बहुतांश भूमी स्वत:च्या छत्राखाली आणली.
आपल्या अपूर्व बुद्धिचातुर्यावर आणि रणकौशल्यावर तो कोणतीही लढाई बघता बघता जिंकत असे. म्हणूनच "तो आला.. त्यानं पाहिलं... आणि त्यानं जिंकलं" असं नेपोलियनच्या बाबतीत म्हटलं जातं.
जसा नेपोलियनचा झपाट्यानं उत्कर्ष होत गेला तसाच अपकर्षही हृदयद्रावक पद्धतीनं झाला. प्रस्तुत कादंबरीत त्याच्या जीवनात घडलेल्या अनेक नाट्यपूर्ण घटनांवर प्रकाश टाकलेला आढळेल. फ्रेंच राज्यक्रांतीपासून ते नेपोलियनला ठकवून सेंट हेलिनामधे नेईपर्यंतचा कालखंड या कादंबरीत रेखाटला आहे.
प्रेम-विरह, फितुरी-हेरगिरी, डाव-प्रतिडाव, युद्ध-शांती अशा विविध अंगांनी नटलेली नेपोलियन बोनापार्ट याच्या जीवनावरील ही अद्भुतरम्य, रससिद्ध कादंबरी 'दिग्विजय’

  • Format:Paperback
  • Pages:620 pages
  • Publication:
  • Publisher:Mehta Publishing House
  • Edition:
  • Language:mar
  • ISBN10:
  • ISBN13:
  • kindle Asin:B0DN27MJY4

About Author

B.D. Kher

B.D. Kher

4.08 423 27
View All Books

Related BooksYou May Also Like

View All